esakal | पिंपरी-चिंचवडमधील भय संपणार कधी? टोळक्याकडून पुन्हा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमधील भय संपणार कधी? टोळक्याकडून पुन्हा हल्ला
  • भोसरीत टोळक्‍याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला 
  • टोळक्याच्या दहशतीमुळे दुकाने केली बंद 

पिंपरी-चिंचवडमधील भय संपणार कधी? टोळक्याकडून पुन्हा हल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मित्राच्या खुनात सहभागी असल्याच्या कारणावरून टोळक्‍याने आरोपीच्या भावावर प्राणघातक हल्ला केला. आरडाओरडा करीत दहशत निर्माण केल्याने परिसरातील दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. ही घटना भोसरी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोतीरावे ऊर्फ काळ्‌या (वय 20, रा. संत तुकारामनगर, भोसरी), आकाश शर्मा (वय 22, रा. भोसरी), मंगेश साठे, रा. भोसरी) यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संजय सुभाष शेखापुरे (वय 22, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी शनिवारी (ता. 31) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आळंदी रोड येथील एका दुकानासमोर होता. त्यावेळी आरोपी तेथे आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीचा भाऊ हा आरोपींचा मित्र मयूर बोडके याच्या खुनात सहभागी असल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरडा करीत दहशत निर्माण केल्याने परिसरातील दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. दरम्यान, देवकाते हा फिर्यादीवर कोयता मारत असतानाच फिर्यादीने अडविला. तेवढ्यात आरोपी सौरभ याने फिर्यादीच्या डोक्‍यात कोयत्याने वार केला. त्यावेळी त्यांना ढकलून फिर्यादीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता शर्मा, साठे व एका अल्पवयीन आरोपीने त्यांना खाली पाडून लाथांनी मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.