'स्वच्छ'च्या सर्वेक्षणात केंद्र आणि राज्यात बाजी मारणाऱ्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची अस्वच्छतेकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

 केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात आठवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळणारे देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची सध्या अस्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. दिवसेंदिवस विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचा देशात आठवा क्रमांक मिळाला.

देहू : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात आठवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळणारे देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची सध्या अस्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. दिवसेंदिवस विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचा देशात आठवा क्रमांक मिळाला.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?    

सदन कमांड विभागात पहिला क्रमांक मिळाला. मात्र, मिळालेल्या क्रमांकाचे मान राखण्यात बोर्ड कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. देहूरोडमधून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा आहे त्याच ठिकाणी जाळण्यात येत आहे. त्यामुळे हवेत प्रदूषण होत आहे. कचरा साचल्याने दुर्गंधीही पसरत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उड्डाणपुलाखाली मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बसून आहेत. पुलाखालीही स्वच्छता आहे. त्यामुळे देहूरोड भकास दिसत आहे. या पुलाखाली अनेक वाहन चालकांनी आपली बंद पडलेली वाहने पार्क केली आहेत. बोर्ड प्रशासनाने महामार्ग स्वच्छ ठेवावा तसेच पुलाखाली स्वच्छता राखावी, अशी मागणी देहूरोडमधील नागरिक करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage in Dehu area