
जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरातील कचरा संकलन सध्या गेली अनेक वर्षांपासून पवना नदीकाठावरील जलसंपदा विभागाच्या मोकळ्या जागेत पारंपरिक पद्धतीने होत आहे. दिवसेंदिवस कचरा संकलन वाढत असून, उघड्यावर होणाऱ्या कचरा संकलनामुळे परिसरात दुर्गंधी व बकालपणा येत आहे. संकलन करणारी वाहने, कॉम्पॅक्टर आता माहेश्वरी चौक व संविधान चौक या रस्त्यावरच कचरा संकलन आणि गाड्या भरण्याचे काम करत असल्याने परिसराला बकालपणा येत आहे.