
चिंचवड : चिंचवडेनगर येथील तुळजाभवानी चौक तसेच बिजलीनगर ते चिंचवडगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला संभाजी चौकामध्ये तीन ते चार दिवसांपासून कचऱ्याचे साचलेले ढीग उचलले नसल्यामुळे अर्ध्या रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे खूप प्रमाणात कावळे जमा होत असून वाहनचालक, स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.