सामाजिक सलोखा! तवकल्ला जामा मशिदिकडून गणपती विसर्जन मिरवणुकीचे स्वागत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tavkalla Jama Masjid

लोकमान्य टिळकांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती.

सामाजिक सलोखा! तवकल्ला जामा मशिदिकडून गणपती विसर्जन मिरवणुकीचे स्वागत!

पिंपरी - लोकमान्य टिळकांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. टिळकांच्या याच कार्यापासून प्रेरणा घेत नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मशिदी कडून सामजिक सलोखा कायम रहावा हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम रहावे या उद्दिष्टाने सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूकी मधील सर्व गणेश भक्तांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करीत सामाजिक संदेश दिला.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मशिदी कडून नेहरू चौकात गणपती विसर्जन विविध मंडळांच्या अध्यक्षांचा शॉल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला तर मिरवणुकीतील सर्व कार्यकर्ते, गणेश भक्तांना गुलाबपुष्प, पाणी, अल्पोहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक भोजराज धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाठे, तवकल्ला जामा मस्जिद चे अध्यक्ष नजीर तरासगार, सचिव रशीद पिरजादे, फारुक इनामदार, मुनाफ तराजगार, नईम बादशहा, बबलु सय्यद, अशपाक शेख, मेहबूब मुल्ला, साजिद सय्यद, मुन्ना बेग, सलीम पठाण, सुलतान कुरेशी, मोहतसीम दळवी, शायद सिद्दिकी, हिफजान शेख,

कार्यक्रमासाठी एकता मित्र मंडळाचे दत्ता तळेकर, संदीप बेळगावकर, रमेश ददचीज, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Gganesh Visarjan 2022 Pimpri Chinchwad Tavkalla Jama Masjid Miravnuk Welcome

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..