कॉलेजला जात असताना काळाने केला घात; टेम्पोच्या धडकेत विद्यार्थीनी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanashri Rajekar

कॉलेजला चाललेल्या महाविद्यालयीन युवतीच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. यात ती खाली कोसळली.

कॉलेजला जात असताना काळाने केला घात; टेम्पोच्या धडकेत विद्यार्थीनी ठार

हिंजवडी - कॉलेजला चाललेल्या महाविद्यालयीन युवतीच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. यात ती खाली कोसळली. त्यामुळे टेम्पोचे चाक तीच्या अंगावरून गेल्याने जागीच तीचा अंत झाला. हा अपघात मारुंजी रस्त्यावरील मुरकुटे वस्ती येथे बुधवारी (ता. २१) सकाळी नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

धनश्री भगवान राजेकर (वय १७, रा. मुकाई नगर, हिंजवडी) असे या आपघातात मृत्यू झालेल्या दुदैवी विद्यार्थीनीचे नाव आहे. तर टेम्पोचालक निंबा मुरलीधर गोसावी (वय. ३३, रा. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. धनश्री ही मारुंजी येथील अलार्ड पब्लिक स्कुल ज्युनियर कॉलेजमध्ये इयता ११ वी सायन्स मध्ये शिकत होती.

याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेहमीप्रमाणे सकाळी धनश्री एमएच १४, केई ९८४१ क्रमांकाच्या दुचाकीवरून कॉलेजला जात होती. हिंजवडी-मारुंजी रस्त्यावरील मुरकुटे वस्ती येथे एमएच १२, क्यूजी २२३२ क्रमांकाचया मागून

भरधाव आलेल्या टेम्पोने दुचाकीला धकड दिली. गंभीर जखमी झाल्याने ती जागीच गतप्राण झाली.

धनश्री अभ्यासात हुशार व स्वभावाने मनमिळावू असल्याने तीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तीला दहावीत ८६ टक्के मार्क मिळाले होते. दोन दिवसांपूर्वीच १९ सप्टेंबरला तीने वाढदिवसही साजरा केला होता.

Web Title: Girl Student Death In Tempo Accident Crime Hinjewadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..