तरुणांनो डेटिंग अॅप वापरताय तर थांबा; वाकडमध्ये तरुणीनं तरुणाला गंडवलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

  • फिर्यादी व आरोपी तरुणी यांची बंबल डेटिंग ऍपवरून ओळख झाली होती.

पिंपरी : बंबल डेटिंग ऍपवरून ओळख झाल्यानंतर तरुणीने तरुणाला भेटण्यासाठी बोलविले. तरुण भेटण्यासाठी आल्यानंतर थंडपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील दीड लाखांचा ऐवज चोरून तरुणी पसार झाली. हा प्रकार वाकड येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आशिषकुमार बी. (रा. रेलनगर, कोयमबिडु, चेन्नई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तरुणीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी तरुणी यांची बंबल डेटिंग ऍपवरून ओळख झाली होती. दोघेजण चॅटिंग करीत असताना 'मला कामाची गरज आहे' असे सांगून आरोपीने फिर्यादीला 18 जानेवारीला (सोमवार) पुणे-बंगलोर महामार्गावरील वाकड येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलविले.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेथे आरोपी तरुणीने थंडपेयात गुंगीचे औषध देऊन फिर्यादीला बेशुद्ध केले. त्यानंतर फिर्यादीकडील सोनसाखळी, एक सोन्याची अंगठी, वीस हजारांचा मोबाईल व पंधरा हजारांची रोकड असा एकूण दीड लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl who was introduced on the dating app stole from the boy

टॉपिकस