व्यापाऱ्यांना नोकरी द्या

व्यापाऱ्यांना महापालिकेत नोकरी द्या, अशी अजब मागणी महापौर उषा ढोरे यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोरच आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.
PCMC
PCMCSakal
Updated on

पिंपरी : शहराचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे, त्यामुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्या; नाही तर व्यापाऱ्यांना महापालिकेत नोकरी द्या, अशी अजब मागणी महापौर उषा ढोरे यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोरच आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली. दरम्यान, दुकानांची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारावर धरणे धरले.

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, सरकार व प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गास मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील दुकाने आठवड्याचे सातही दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी पिंपरी मर्चंट फेडरेशनने बुधवारी महापालिका भवनावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंमडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन दिले. त्यानंतर महापौर ढोरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले

PCMC
COVID19 : राज्यात दिवसभरात ६,१२६ नव्या रुग्णांची नोंद

त्या वेळी महापौरांनी आयुक्तांना बोलावून घेत व्यापाऱ्यांची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे कोरोना परिस्थिती सुधारली आहे. आता शहराचा पॉझिटिव्हिटी दर तीन टक्के आहे. जिल्ह्याचा दर जास्त असल्यामुळे तो नियम शहरासाठी लावणे चुकीचे आहे. गेल्या दीड वर्षात सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. व्यापाऱ्यांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. शेवटी एका घरात अनेकांना डांबून ठेवल्यास कोरोना होणारच ना! कारण, सर्वांची घरे मोठी नाहीत. व्यापाऱ्यांच्या मागणीबाबत शुक्रवारी पालकमंत्री यांच्याशी बोलणार आहे.’’

कोरोना पॉझिटिव्हिटी दर विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा, असा राज्य सरकारचा आदेश आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती पाहून आयुक्तांनी निर्बंध शिथिल करावेत व दुकानांची वेळ सातपर्यंत वाढवून द्यावी, अशी भूमिका आसवानी यांनी मांडली. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘‘राज्य सरकारचा तसा आदेश असेल तर, उद्याच निर्णय घेतो. पण, माझ्यापर्यंत तसा आदेश अद्याप आलेला नाही. सरकारचा आदेश हा संपूर्ण राज्यासाठी होता. दुपारी चारपर्यंत दुकानांची वेळ होती. आता सात-आठ जिल्ह्यांतील परिस्थिती सुधारल्यामुळे तेथील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. शहरातील वेळेबाबत शुक्रवारच्या बैठकीत पालकमंत्र्यांशी बोलतो.’’

पालिका कर्मचारी पैसे मागतात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पथके नियुक्त केली आहेत. मात्र, त्यातील कर्मचारी दुकान बंद करायला पाच-दहा मिनिटे उशिर झाला तरी कारवाई करतात. कधीकधी पावतीही देत नाहीत, अशी तक्रार व्यापाऱ्यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली.

त्या वेळी ‘‘तुमचे कर्मचारी पैसे वसूल करण्यासाठी आहेत का?’’ असा सवाल महापौरांनी आयुक्तांना केला. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘‘नियमांचे पालन व्हावे, नागरिकांवर जरब बसावी यासाठी कारवाई केली जाते. कोणी विनाकारण पैसे मागत असल्यास, पुरावा द्या. संबंधितांवर मी कारवाई करतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com