
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने 28 सप्टेंबर, 2022 ते 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षा वेळापत्रक जाहीर
मोशी - महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला एलिमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षांचे केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, वेळापत्रक असलेले परिपत्रक नुकतेच महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाचे प्रभारी कलासंचालक विश्वनाथ साबळे यांनी राज्यातील सर्व शाळाना पाठवून जाहीर करण्यात आले आहे.
या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने 28 सप्टेंबर, 2022 ते 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने www.doa.maharashtra.gov.in/https://dge.doamh.in या संकेतस्थळावर भरावयची आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
बुधवार, 28 सप्टेंबर, 2022, पेपर 1ला- वस्तुचित्र : स. 10.30 ते दु. 1, पेपर 2 रा- स्मरणचित्र : दु. 2 ते 4
गुरुवार, 29 सप्टेंबर, 2022 : पेपर 3 रा- संकल्पचित्र : स. 10.3 ते दु. 01, पेपर 4 था- कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन : दु. 2 ते 4.
इंटरमेजिएट ड्रॉईंग परीक्षा वेळापत्रक
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022, पेपर 1ला- स्थिरचित्र : स. 10.30 ते 1, पेपर 2 रा- स्मरणचित्र : दु. 2 ते 4,
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022, पेपर 3 रा- संकल्पचित्र : स. 10.30 ते 1.30, पेपर 4 था - कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन : दु. 2. 30 ते 5. 30
शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी/ केंद्राची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने - 1 ते 5 ऑगस्ट 2022 पर्यंत
एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1 ते 30 ऑगस्ट 2022 नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करायची आहे.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने फी पेमेंट गेटवे द्वारे ता. 25 ते 30 ऑगस्ट 22
परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ता. 1 ते 30 ऑगस्ट 2022
एलिमेंटरी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी 80 रुपये तर इंटरमेजिएटच्या विद्यार्थ्यांना 130 रुपये फी आणि ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती www.doa.maharashtra.gov.in https://dge.doamh.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील अशी माहिती कलासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
Web Title: Government Drawing Grade Painting Exam Schedule Announced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..