इंदिरा गांधी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

  • महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम झाला.

पिंपरी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. 

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिला तपासणीचा सल्ला

महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम झाला. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, प्रवीण तुपे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अविनाश तिकोणे, तुकाराम गायकवाड, सुप्रिया सुरगुडे, धनाजी नखाते, नीलेश घुले, योगेश वंजारे, प्रमोद निकम, गोरख भालेकर आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी राष्ट्रीय एकात्मताची शपथ दिली. 

वृद्धाश्रमाला मदत 

शहर जिल्हा युवक कॉंग्रेसने बिजलीनगर येथील संत मौनीबाबा आनंद वृद्धाश्रमाला जीवनोपयोगी साहित्य व अन्नधान्याची मदत केली. काळेवाडीतील आरोग्य कार्यालयात गांधी यांची प्रतिमा भेट दिली. युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव अक्षय जैन, शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, कौस्तुभ नवले, विरेंद्र गायकवाड, दीपक भंडारी, हिराचंद जाधव, नासीर चौधरी आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to Indira Gandhi in Pimpri-Chinchwad