पिंपरी-चिंचवडमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातर्फे त्यांना महापौर उषा ढोरे यांनी अभिवादन केले.

पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातर्फे त्यांना महापौर उषा ढोरे यांनी अभिवादन केले. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष दत्तू चव्हाण, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे खजिनदार वसंत वावरे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिसे, गणेश खंडाळे, संजय ससाणे, नितिन घोलप, अरुण जोगदंड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना महापौरांसमवेत उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, दत्तू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतिश भवाळ, सुनिल भिसे, संजय ससाणे, नितिन घोलप, अरुण जोगदंड, दशरथ कसबे, कैलास पाटोळे, विकास भवाळ आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अभिवादन 

"महाराष्ट्रात साहित्यिक क्रांती घडवण्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मोठे श्रेय आहे," असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचे कष्टमय वास्तव साहित्यातून समोर आणले. त्यातून उपेक्षित समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात साहित्यिक क्रांती घडवण्याचे मोठे श्रेय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना असल्याचे सांगत वाघेरे यांनी आदरांजली वाहिली. अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी उपाध्यक्ष संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, साहेबराव साळवे, कॉंग्रेसचे मनोज कांबळे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाट्य, लोकनाट्य, लावणी, वग, गण, गवळण, पोवाडे, प्रवासवर्णन असे सर्व साहित्यप्रकारातून मराठी साहित्य, लोककला, लोकजीवन त्यांनी समृद्ध केले. तमाशासारख्या कलेला लोकनाट्यकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत, अशा शब्दात वाघेरे यांनी त्यांचा गौरव करुन अभिवादन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: greetings to lokshahir anna bhau sathe in pimpri chinchwad