
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट (एम.बी.ए, एम.सी.ए), आर्किटेक्चर अशा विविध अभ्यासक्रमांच्या आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी केंद्रीय पद्धतीने (ऑनलाइन) कशी राबविणार? याविषयी अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात आहेत. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे विनामूल्य मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट (एम.बी.ए, एम.सी.ए), आर्किटेक्चर अशा विविध अभ्यासक्रमांच्या आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी केंद्रीय पद्धतीने (ऑनलाइन) कशी राबविणार? याविषयी अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात आहेत. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे विनामूल्य मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (ता. १३) होणाऱ्या या चर्चासत्रात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न असतात. जसे की, ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे? प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होणार? ही प्रवेश प्रक्रिया केव्हापर्यंत चालेल? महाविद्यालये कधी सुरू होणार सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे जागा मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
माईक तोडले, ग्लास फोडले, कागदपत्रे फाडली; स्थायी समिती सभेत गोंधळ
कोणत्या शाखेत जायचे हे निश्चित झाले असले तरीही सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी व त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती विद्यार्थी व पालकांना असली की ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होत नाही. पीसीएममध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
काँग्रेस इच्छुकांना शहराध्यक्षपदाचे वेध
त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया या विषयांवर तज्ज्ञ वक्ते डॉ. शीतलकुमार रवंदळे मार्गदर्शन करणार आहेत. तर आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय यावर डॉ. महेंद्र सोनवणे तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय याविषयी प्रा. विजय नवले मार्गदर्शन करतील. विद्यार्थी व पालकांच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. ‘ई-स्क्रुटनी’ म्हणजे काय? ऑनलाइन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे प्रात्यक्षिक प्रा. मनीषा देशपांडे व प्रा. केतन देसले दाखवतील. त्यामुळे नक्कीच सहभागी व्हा.
Edited By - Prashant Patil