हिंजवडी - आयटी पट्ट्यातील कसारसाई गावातील मुलाणी कुटुंबीय शेतकऱ्यांची सुमारे साडेपाच एकर जमिन बेकायदा लिहून देत तीचा ताबा द्यावा म्हणून लँड माफियांच्या टोळक्याने त्यांच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली, शेतकऱ्यांवर बंदुक रोखली. हा प्रकार शुक्रवारी (ता. ६) दुपारी दीडच्या सुमारास घडला. याबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.