esakal | वर्षाची सुरुवात करा व्यायामाने; पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ ठिकाणी अत्याधुनिक जिम
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षाची सुरुवात करा व्यायामाने; पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ ठिकाणी अत्याधुनिक जिम

क्रीडा विभागातर्फे नऊ ठिकाणी अत्याधुनिक जिमची उभारणी

वर्षाची सुरुवात करा व्यायामाने; पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ ठिकाणी अत्याधुनिक जिम

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : ‘‘नवीन वर्षाची सुरुवात व्यायामाने करा. महापालिकेने तालमीला आधुनिक जिमची जोड दिल्याने माती व मॅटवरील कुस्तीचा सराव आणि व्यायामासाठी फायदा होत आहे,’’ असे येथील पहिलवान श्रीधर केळकर व जयराज अनिल ढोरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अनलॉकनंतर सरकारने नियम-अटींचे पालन करून व्यायामशाळांना परवानगी दिली आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे नऊ ठिकाणी अत्याधुनिक जिमची उभारणी केली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना नववर्षाच्या संकल्पात व्यायामाचा समावेश करता येणार आहे, असे क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले. लॉकडाउन काळात सर्वच बंद होते. त्यामुळे पहिलवानांचे माती व मॅटवरील कुस्त्यांच्या सरावाचे नियोजनही बिघडले होते. मातीतील तालमीला आता अत्याधुनिक मॅट, जिमची जोड मिळाल्याने व्यायामप्रेमी व पहिलवानांना दुहेरी फायदा होणार आहे. ‘ह’ प्रभागाच्या क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवी म्हणाल्या, ‘‘प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी दोन बॅच राखीव ठेवण्यात आल्या आहेत.’’

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे साहित्य
मल्टी जंगल ५ स्टॅक, सिटेड बॅकअप मशिन, लेख एक्‍स्टेन्शन, ४५ डिग्री लेख प्रेस, मल्टी पॉवर केज, ऑलिंपिक ईनक्‍लिन बेंच, ऑलिंपिक डिसलाईन बेंच, डंबेल रॉक डबल, डबल वेट प्लेट्‌स, ऑलिंपिक बार, ई-झेड क्‍युरल बार आदी साहित्य उपलब्ध आहे.

अशी आहेत जिमची ठिकाणे
नऊपैकी पिंपळे गुरव : दोन, जुनी सांगवी : दोन, पिंपळे निलख : एक, चिंचवड : एक या ठिकाणी जिम सुरू केल्या आहेत. काही जिम खासगी तत्त्वावर चालवण्यास दिल्या आहेत. एका जिमचे साहित्य व इतर अंदाजित खर्च १३ ते १४ लाख एवढा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून शहरात विविध ठिकाणी या जिम उभारल्या आहेत. लवकरच जुनी सांगवीत महिलांसाठी स्वतंत्र जिम अद्ययावत करण्यात येत आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा.
- उषा ढोरे, महापौर 

सर्व ठिकाणी क्रीडा पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. जुन्या व्यायामशाळांना आधुनिक उपकरणांची जोड दिली आहे.
- रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी

मातीबरोबरच मॅटवरील कुस्तीला जिमची जोड मिळाली आहे. सध्या जुनी सांगवीत ५३ सभासद आहेत. सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ४ ते ९ अशी वेळ आहे. सर्व खबरदारी घेऊन जिम सुरू केली आहे.
- निवृत्ती काकडे, वस्ताद

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)