महापालिकेकडून गेल्या चार महिन्यापासून होत नाही औषध फवारणी; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

The health of the citizens has been endangered due to non-spraying of drugs by the Municipal Corporation for the last four months
The health of the citizens has been endangered due to non-spraying of drugs by the Municipal Corporation for the last four months
Updated on

पिंपरी : डासांच्या निर्मूलनासाठी महापालिकेकडून किटकनाशक फवारणी करण्यात येते. मात्र, गेल्या चार महिन्यापासून किटकनाशक फवारणी करण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. जतूंनाशकऐवजी किटकनाशक फवारणी करण्याची मागणी केल्यावर 'आमच्याकडे औषध शिल्लक नाही' असे उत्तर ऐकायला मिळत असल्याचा अनुभव आकुर्डीतील के. के. कांबळे यांनी कथन केला. गेल्या चार महिन्यापासून हेच उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले. अशाप्रकारे शहरातील बहुतांश भागात किटकनाशक फवारणी केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या डासांमुळे मलेरिया, डेंगी व चिकनगुणियाचे रूग्णसंख्या वाढत आहे. छोट्या-मोठ्या क्‍लिनिकमध्ये सर्वाधिक याच रुग्णांची संख्या दिसून येत आहे. त्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या संख्येने तक्रारी आहेत. डास निर्मूलनासाठी महापालिकेकडून विविध औषधांची खरेदी केली जाते. परंतु सध्या कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर महापालिका तातडीने त्या परिसरात जंतुनाशक फवारणी करते. दुसरीकडे मात्र गेल्या चार महिन्यापासून किटकनाशक फवारणी केली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन फवारणी करून नागरिकांची नोंद करणे आवश्‍यक आहे. पण अनेकजण दोनेक घर फिरल्यावर साहेबांनी बोलविल्याचे सांगून पळ काढत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

सचिन निकम म्हणाले, 'विठ्ठलवाडी, दत्तवाडी या परिसरात गेल्या चार महिन्यापासून किटकनाशक फवारणी केली नाही. महापालिका कर्मचाऱ्यांकडे वारंवार मागणी केली आहे. परंतु औषध नसल्याचे उत्तर मिळते.'

वाहिद पटेल म्हणाले, 'शहरात कोरोनामुळे बाकीच्या आजाराकडे दुर्लक्ष केले आहे. जंतुनाशक फवारणी केली जाते, पण किटकनाशक, औष्णिक धुरीकरण केले जात नाही. नागरिक मोठ्यासंख्येने डेंग्युने आजारी पडले आहेत.'

आरोग्य विभाग महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते म्हणाले, 'आमचे कर्मचारी फवारणी करत आहेत. आता डेंग्युचे रुग्ण सापडल्यावर फवारणी करण्यात येणार आहे. पण सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फवारणी सुरू आहे.'
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com