esakal | पिंपरीतल्या कोरोना रुग्णाला मिळत नव्हता बेड; आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केला फोन

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope
पिंपरीतल्या रुग्णाला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिळवून दिला बेड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चक्क एका कोरोना रुग्णासाठी थेट वायसीएमच्या डॉक्टरांना फोन केल्याची घटना आज (ता.24) घडली. त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यास सांगितले. राज्याचा भार त्यांच्यावर असताना त्यांनी तत्परता दाखवत रुग्णाला बेड मिळवून दिला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्लाझ्मा देण्यात आला आहे, अशी माहिती डॉक्टर विनायक पाटील यांनी माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज अडीच हजारांच्या जवळ रुग्ण आढळत आहेत. मृतांची संख्यादेखील वाढत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, आज एका कोविड रुग्णाला बेड मिळत नसल्याने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तत्परतेने वायसीएममधील डॉ. विनायक पाटील यांना संपर्क करून रुग्णाला तातडीने बेड देण्यास सांगितले. तसेच, स्वतःची काळजी घेण्यास सांगितले.

हेही वाचा: भाजप आमदाराच्या नातेवाईकाचा पुण्यात काँग्रेस प्रवेश

रुग्णाला तातडीने भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. विनायक  पाटील यांनी दिली आहे. प्रकृती गंभीर असल्याने तातडीने प्लझ्मा देण्यात आला आहे. दरम्यान, वायसीएम रुग्णालय हे हजारो रुग्णासाठी वरदान ठरत असून रुग्ण बरे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णालय प्रशासन चांगलं काम करत असल्याने कौतुक होत आहे.