Pimpri Chinchwad Roads Flooded Due to Rain
esakal
पिंपरी-चिंचवड
Heavy Rain in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे
Traffic Disruption : पिंपरी-चिंचवडमध्ये सलग तीन दिवस चाललेल्या पावसाने रस्त्यांवर खड्ड्यांची भर झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पवना धरण १०० टक्के भरल्यामुळे आसपासच्या भागात पाण्याची पातळी वाढली आहे.
पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बरसलेल्या पावसाने दाणादाण उडाली. रविवारी (ता.१४) रात्रीपासून संततधार सुरूच होती. सोमवारी (ता.१५) पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळीही तो कायम होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली.