VIDEO : पावसाच्या पाण्याने भोसरीकरांची वाट अडवली!

संजय बेंडे
रविवार, 31 मे 2020

येथील इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसी परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते.

भोसरी : येथील इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसी परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली. काही रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याने पाऊस थांबल्यानंतर तीन तासानंतरही पावसाचे पाणी रस्त्यावर होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना अपघातही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची उपाययोजना महापालिकेने तातडीने करावी, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता. ३०) भोसरी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरात विजेच्या गडगडाटासह वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे भोसरीतील इंद्रायणीनगरमधील स्वामी समर्थ शाळेजवळ संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलसमोरील रस्ता, संतनगर चौक, पेठ क्रमांक सातमधील पद्मावती सोसायटीसमोरील रस्ता, बी. जी. संकूलजवळील रस्ता, भोसरी एमआयडीसीतील प्लॅाट क्रमांक दोनशे ३९, प्लॅाट क्रमांक २७ आदी भागांतील रस्त्यावर पाणी साचले होते. या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याने पाऊस थांबल्यानंतर तीन तासानंतरही पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होते. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची उपाय योजना तातडीने करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे. या विषयी महापालिकेचे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी सांगितले, की  इंद्रायणीनगरातील स्वामी समर्थ शाळेजवळ संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलसमोरील रस्त्यावर पावसाळ्यात सुमारे तीन फूटापर्यंत पाणी साचते.  त्यामुळे पावसाळ्यात येथून जाताना बऱ्याच दुचाकी बंद पडतात.  शाळा सुरू झाल्यावर पावसाळ्यात स्वामी समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केली पाहिजे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चक्रपाणी वसाहतीत झाडाने केला लॅाकडाउन 

जोरदार वारे आणि पावसामुळे चक्रपाणी वसाहतीतील फुलेनगरमधील झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. साडेतीन वाजता पडलेल्या झाडाच्या फांद्या रात्री आठवाजल्या तरी रस्त्यावरच होत्या. त्यामुळे नागरिकांची या रस्त्यावरील ये-जा बंद झाली होती. त्यामुळे झाडाने फुलेनगरमध्ये लॅाकडाउन केल्याची चर्चा नागरिकांत होती. महापालिकेला कळवूनही झाड उचलण्यासाठी कर्मचारी आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy raining in bhosari area