
भोसरी : इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेस पुणे - नाशिक महामार्गावरून खासगी बस आणि जड वाहने येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. चौक परिसरात अनधिकृतपणे बसत असलेले विविध वस्तू विक्रेत्यांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी वाहनचालक, दुकानदार आणि नागरिक यांच्यामधून होत आहे.