- बेलाजी पात्रेहिंजवडी - आयटी पंचक्रोशीत अवजड व बेदरकार अवजाड वाहनांनी गेल्या दोन वर्षात शेकडो निष्पाप जीवांचे बळी घेतलेत. बेकाबू वाहनांच्या दहशतीला लगाम लावण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे..चालकांसह मालकांवरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे धारिष्टय त्यांनी दाखविल्याने आयटीतील रस्त्यांवर साक्षात यमदूत बनून वावरणाऱ्या मग्रूर चालक-मालकांना चांगलीच अद्दल घडणार आहे. हिंजवडी पोलिसांच्या या कठोर मात्र अत्यावश्यक भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..आयटीतील अवजड वाहनांची दहशत, वारंवार होणारे अपघात, त्यात जाणारे नाहक बळी आणि वाहतूक पोलीस, परिवहन प्रशासनाची मूग गिळून बघ्याची भूमिका यावर सकाळने सातत्याने प्रकाश टाकला आहे. त्याचीच परिणीती हिंजवडीतील गुन्हा दाखल करण्यात झाली आहे.कारवाईचा पहिला झटका हिंजवडी पोलिसांनी मिक्सर मालकाला दिला आहे. वाहन दुर्घटनांमध्ये केवळ चालक नव्हे, तर मालक आणि कंत्राटदार यांनाही जबाबदार धरण्याची भूमिका सर्व प्रथम हिंजवडी पोलिसांनी घेतली असून त्यांचे अनुकरण शहरातील इतर पोलिस ठाण्यांनी केल्यास शेकडो निष्पापांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे..वाहतूक नियमांचा भंग करून बंदी असलेल्या वेळेत जड वाहनांची वर्दळ सुरू ठेवणारे मालक आणि कंत्राटदार आता कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत. शहरात वारंवार घडणाऱ्या अपघातांमागे मालकांचा निष्काळजीपणा आणि जड वाहनांना बंदी असलेल्या वेळेतही शहरात सोडण्याची प्रवृत्ती कारणीभूत ठरते. त्यामुळे आता मालकांसह जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले..ठळक मुद्दे- सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे.- चालकासोबतच मालक, सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही कायदेशीर कारवाई.- भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हे.- पिंपरी-चिंचवड परिसरात विशेष करून आयटी पार्क हिंजवडी पंचक्रोशीत गेल्या दोन वर्षातील अपघातांचा मोठा वाढता आकडा आहे- रस्ते अपघात टाळण्यासाठी कडक अंमलबजावणीसह दोषींवर कठोर शिक्षेची मागणी- हिंजवडी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक.चालक-मालक व सुपर वायझरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाहिंजवडी पोलिसांनी प्रत्युषाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालक फरहान मुन्नू शेख (वय. २५, रा. वाकड, मूळ रा. बिहार) याला अटक केली होती. त्यानंतर तपासाअंती घटनेस जबाबदार असलेला मिक्सरमालक प्रदीप मारुती साठे (वय. ३९, रा. विनोदे नगर, वाकड) आणि सुपरवायझर प्रसाद विठ्ठल मंडलिक याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे..प्रवेश बंदीत घुसखोरीवाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी हिंजवडी व आसपासच्या परिसरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मात्र, या अपघात प्रकरणात ट्रकचालकाने नियम धाब्यावर बसवून बंदीच्या वेळेत वर्दळीच्या ठिकाणी प्रवेश करून अपघातास कारणीभूत ठरला..आयटी पार्क हिंजवडीत अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून हिंजवडी वाहतूक व पोलीसांची बंदीच्या वेळात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची संयुक्त मोहीम सुरु होती. याची माहिती सर्व चालक-मालकांना आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचे जबाबदार व्यवस्थापक, चालक-मालक यांनीही नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई अटळ आहे.- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.