esakal | मावळातील शेतकऱ्यांसाठी बाळा भेगडेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागितली एवढी मदत
sakal

बोलून बातमी शोधा

मावळातील शेतकऱ्यांसाठी बाळा भेगडेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागितली एवढी मदत

भेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा दिला. 

मावळातील शेतकऱ्यांसाठी बाळा भेगडेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागितली एवढी मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात नुकसान झालेल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने एकरी दहा ते पंधरा लाख रुपये मदत करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी कोकण व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. भेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

मावळ तालुक्यात एक हजार एकर क्षेत्रावर हरितगृहातील फुलशेती व भाजीपाला केला जातो. देशातील एकूण उत्पादनाच्या ७० टक्के गुलाब फुलांचे उत्पादन मावळात होते. निर्यातीतून देशाला हजार ते बाराशे कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळते. परंतु, ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा या फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. सुमारे आठशे एकरावरील फुलशेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना एकरी दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भेगडे यांनी केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तोमर यांनी सांगितले, की केंद्र सरकारने राज्य सरकारला राज्य आपत्ती निवारण निधी सुपूर्त केला आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीसाठी राज्य सरकारने केंद्राला योग्य तो प्रस्ताव पाठविल्यास त्या अनुषंगाने कार्यवाही केली जाईल. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय सहसंघटन मंत्री वीर सतीश, संघटन मंत्री विजय पुराणिक, विनोद तावडे, खासदार विनायक सहस्त्रबुद्धे ,आमदार रवींद्र चव्हाण,  नितेश राणे, प्रशांत ठाकूर, प्रसाद लाड आदी सहभागी झाले होते.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image