मावळात सर्वाधिक रुग्ण तळेगावात, पाठोपाठ लोणावळा अन् वडगावचा नंबर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ४३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ४३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ५८ वर्षीय व २६ वर्षीय पुरुष आणि वडगाव येथील ७० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७७४ आणि मृतांची संख्या ७२ झाली आहे. आतापर्यंत एक हजार ३२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४३ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १६, कामशेत येथील सहा, कुसगाव बुद्रुक व सुदुंबरे येथील प्रत्येकी तीन, वडगाव, कुणे नामा व वरसोली येथील प्रत्येकी दोन; तर लोणावळा, कुरवंडे, धामणे, इंदोरी, देवघर, काले, मळवली, वाकसई, खडक गेव्हँडे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ७७४ झाली असून, त्यात शहरी भागातील ९१५, तर ग्रामीण भागातील ८५९ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ५९०, लोणावळा येथे २०३ व वडगाव येथील रुग्ण संख्या १२२ झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना मिळणार उद्यापासून 'जम्बो फॅसिलिटी' 

तालुक्यात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार ३२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ११ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३८१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २६३ जण लक्षणे असलेले व ११८ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २६३ जणांपैकी १७३ जणांमध्ये सौम्य, तर ७४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ३८१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यात मृतांची संख्या वाढत असून, मृतांमध्ये वृद्ध व गंभीर आजार असलेल्या व्यक्तिंचा समावेश असल्याने अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. लोहारे यांनी केले आहे.

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest covid patients in talegaon dabhade maval