Hinjawadi Metro: हिंजवडी मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळांची प्रतीक्षा कधी संपणार? बालेवाडी-बाणेरमधील पार्किंगचे काम अपूर्ण, इतर ठिकाणी नियोजन कागदावरच

Hinjawadi Metro Parking Problem Persists Despite Rising Passenger Footfall : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी सोयीची ठरत असली, तरी स्थानकांजवळ पार्किंगची सुविधा अपुरी आहे. दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत आहे.
Hinjawadi Metro Parking Problem Persists Despite Rising Passenger Footfall :

Hinjawadi Metro Parking Problem Persists Despite Rising Passenger Footfall

esakal

Updated on: 

पिंपरी : शिीनगर ते हिंजवडी- माण मेट्रोचा प्रवास सुरू झाला आहे. प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, मेट्रो स्थानक परिसरात वाहने उभी करण्याचा (पार्किंग) विशेषतः दुचाकी उभ्या करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण रस्त्याच्या कडेला, पदपथांवर वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, मेट्रो प्रवासाचा पर्याय सोयीचा ठरत असला, तरी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका असून, पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...