
अश्विनी पवार
पिंपरी : राज्यात पुण्यातील सर्वांत मोठे आयटी पार्क म्हणून हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कची ओळख आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गेल्या पाच वर्षांत केवळ दोनच भूखंड नव्या आयटी कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या कंपन्यांनी विविध कारणांसाठी हिंजवडीकडे पाठ केल्याचे दिसते.