
हिंजवडी : आयटीनगरी माण, हिंजवडी गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत जाणार असल्याच्या चर्चा आणि हालचाली सध्या सुरू आहेत. हिंजवडीचा महापालिकेत समावेश होण्याबाबत आयटीयन्स ठाम आहेत. तर; सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘यापूर्वी समाविष्ट गावांचा परिपूर्ण विकास करा, मगच आमची गावे महापालिकेत घ्या’ अशी भूमिका या दोन्ही ग्रामपंचायतींसह स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे हिंजवडी पालिकेत समावेशाबाबत स्थानिकांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.