

PMRDA Plans Hinjewadi Metro Access Roads Footpaths and Cycle Tracks to Connect IT Parks Housing Societies and Nearby Villages
sakal
पिंपरी: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवेला प्रवाशांचे प्राधान्य मिळावे, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गिकेलगतच्या प्रयोगांचा अभ्यास केला आहे. पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गिकेलगतचे पादचारी मार्ग, सायकल मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचा आदर्श समोर ठेवून हिंजवडी मेट्रो स्थानकांच्या परिसरातही अशाच सुविधा विकसित करण्याचे नियोजन केले आहे.