
पिंपरी : हिंजवडीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिक्रमण विरोधी कारवाईला वेग आला आहे. गेल्या पंधरवड्यात ५३ अतिक्रमणे हटविण्यात आली. नालेसफाईसाठी तसेच राडारोडा काढण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील जवळपास सर्वच अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. ‘पीएमआरडीए’ व ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी संस्थेची नेमणूक केल्याचेही सांगण्यात आले.