हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती;आर्थिक ताळेबंद करार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा आर्थिक ताळेबंद करार टाटा कंपनी व पीएमआरडीएमध्ये गुरुवारी औंध येथील कार्यालयात झाला. यामुळे मेट्रोच्या कामास गती मिळणार असून, केंद्राच्या व्यवहार्यता तफावत निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर होणारा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा आर्थिक ताळेबंद करार टाटा कंपनी व पीएमआरडीएमध्ये गुरुवारी औंध येथील कार्यालयात झाला. यामुळे मेट्रोच्या कामास गती मिळणार असून, केंद्राच्या व्यवहार्यता तफावत निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला या आठवड्यामध्ये सादर करण्यात येणार आहे.

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ६१२४ कोटीच्या या प्रकल्पाला सार्वजनिक वाहतुकीसाठी निकडीचा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गावर २३ स्टेशन होणार असून, २३.२० किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या प्रस्तावामध्ये यापूर्वी केंद्राकडून त्रुटी काढण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारच्या हिश्‍श्‍याच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी हा प्रकल्प अडचणीत सापडण्याची चिन्हे होती. केंद्र सरकारने हे पैसे न दिल्यास केंद्राच्या हिश्‍श्‍याचे बाराशे कोटी पीएमआरडीएला उभे करावे लागणार होते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

केंद्राचे २० टक्के, राज्य सरकारचे २० टक्के व टाटा कंपनीचे ६० टक्के भागीदारी ठरलेली आहे. टाटा कंपनी या प्रकल्पासाठी एसबीआय बॅंकेकडून कर्ज उभे करणार आहे. राज्य सरकारची यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. टाटाचे संचालक आलोक कपूर, अर्थतज्ज्ञ अंकुर शेठीया, आयुक्त सुहास दिवसे, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, लेखा अधिकारी श्रीहरी खुर्द, अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता भरत बाविस्कर, स्टेट बॅंकेचे अधिकारी करारावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

पीएमआरडीएला मिळणार निधी
मेट्रोच्या निकषानुसार आर्थिक पडताळणीनंतर टाटा कंपनीकडून हा करार अंतिमतः: मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर क्रेंद्र सरकारच्या शंकाचे वारंवार निरसन करून निधीसाठी अंतिमतः: पाठविला जाणार आहे. पीपीपी तत्त्वानुसार केलेला मेट्रोचा प्रस्ताव केंद्राला यापूर्वी अटी-शर्तीनुसार सादर करण्यात आला होता. केंद्राकडून तत्त्वतः: मार्च २०१८ ला मान्यता मिळाली होती. ३१ जानेवारीपर्यंत प्रकल्प सादर झाल्यानंतर प्रकल्पाचे आर्थिक सर्वेक्षण होईल. या करारामुळे केंद्राकडून मेट्रोसाठी पीएमआरडीएला निधी मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinjewadi-Shivajinagar Metro work Financial agreement