

Poor Road Conditions Increasing Risk for Two-Wheeler Riders
Sakal
अश्विनी पवार
पिंपरी : बेदरकार अवजड वाहनांची वर्दळ आणि रस्त्यांवरील खड्डे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. मध्यवर्ती भागासोबतच उपनगरांमध्येही अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुनावळे आणि मोशी येथे नुकतेच झालेल्या अपघातांच्या घटनांमुळे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे रस्त्याची संथगतीने सुरू असणारी कामे व अवजड वाहनांवर कारवाई करण्याबाबत पोलिस प्रशासनाची उदासिनता यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, या वाहनांना रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडे नाही.