

Residents Warn Protest Over Pollution in Hinjewadi, Wakad
Sakal
वाकड : हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालल्याने रहिवाशांना चक्क मास्क घालून फिरावे लागत आहे. मात्र, प्रदूषणाच्या ‘व्हायरस’बाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. या प्रश्नांबाबत वाकड व हिंजवडी पोलिसांबरोबर रहिवाशांची बैठक झाली. त्यामध्ये रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही बांधकाम कंपन्या आणि आरएमसी युनिट्सचे वाहनचालक नियमांचे खुलेआम उल्लंघन करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.