
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि हिंजवडी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क यांच्या मध्यवर्ती असलेल्या हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डी, जांबे या भागांमध्ये बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. विस्तीर्ण रस्ते, बीआरटी मार्ग, पुणे मेट्रोचे प्रस्तावित जाळे तसेच मुंबई-बंगलोर महामार्गाची उत्तम कनेक्टिव्हिटी अशा विविध जमेच्या बाजू असल्यामुळे प्रीमियम प्रॉपर्टीची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.