
बेलाजी पात्रे
हिंजवडी : जगद््विख्यात हिंजवडी आयटी पार्कच्या पंचक्रोशीत कार्यरत असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) स्थापनेपासून आजवर केवळ बघ्याची भूमिका घेत अनधिकृत बांधकामांना मूक सहमतीच दिली. त्यामुळे आयटी पंढरीत लाखो अनधिकृत बांधकामे झाली. आजही रोज हजारो बांधकामे सुरू असल्याने आयटीच्या चहूबाजूंनी अंधाधुंद आणि ओंगळवाण्या बांधकामांची बजबजपुरी मातली आहे. त्यामुळे, आयटीची ‘कुदळवाडी’ होण्याआधी त्याला अंकुश लावा, अशी मागणी होत आहे.