esakal | वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्र्याच्या हस्ते सत्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

aabasaheb-sawant

तब्बल एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बॉनेटवर लटकून फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, सोमवारी (ता.9) त्यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्र्याच्या हस्ते सत्कार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - जीव धोक्‍यात घालून पोलिस दलाच्या कर्तव्याप्रती निष्ठा राखणारे वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असलेले आबासाहेब सावंत हे चिंचवड येथे गुरूवारी (ता.5) विनामास्क जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी एका मोटारचालकाने त्यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बॉनेटवर लटकून फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, सोमवारी (ता.9) त्यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुंबईतील गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते. 

ट्राफीक पोलिसाला बोनेटवरून नेलं आणि म्हणे, माझी चूक काय?

अनिल देशमुख यांनी सावंत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक करीत जिवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत सारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही आबा सावंत यांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा