
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते मिळविण्यासाठी राज्य केंद्र व निमसरकारी तसेच बॅंकांमधून निवृत्त झालेल्या पेन्शनर धारकांना धावपळ करावी लागते. आता त्यांची धावपळ कमी करण्यासाठी निवृती वेतनधारकांसाठी टपाल विभागामार्फत विशेष सेवा देण्यात आली आहे.
पिंपरी : इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक (आयपीपीबी) पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) सबमिट करण्यासाठी घरपोच सुविधा प्रदान केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत 300 पेन्शरांनी सुविधेचा लाभ घेतला असून सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनरांना घरपोच सुविधा नक्कीच उपयुक्त ठरत आहे.
हे ही वाचा : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे यश; शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते मिळविण्यासाठी राज्य केंद्र व निमसरकारी तसेच बॅंकांमधून निवृत्त झालेल्या पेन्शनर धारकांना धावपळ करावी लागते. आता त्यांची धावपळ कमी करण्यासाठी निवृती वेतनधारकांसाठी टपाल विभागामार्फत विशेष सेवा देण्यात आली आहे. घरपोच टपाल द्यायला येणाऱ्या पोस्टमन यांच्यामार्फत पेन्शनर्स जीवन प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांनी दिली. टपाल कार्यालयातील सर्व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक मशीन दिले आहेत. पोस्टमन घरी आल्यानंतर ७० रुपये शुल्क आकारून मोबाईल ऍपद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची नोंद करता येणार आहे.
हे ही वाचा : मोबाईल चोरणारे दोन सराईत चोरटे गजाआड; बारा मोबाईल जप्त
पेन्शनर त्यांच्या मोबाईल फोनवर 'पोस्ट इन्फो' ऍप डाऊनलोड करून आपली विनंती नोंदविल्यावर त्यांना जीवनप्रमाणपत्र घरपोच मिळत आहे. त्यासाठी पेन्शन व्यक्तीने पेन्शनर प्रकार, वितरण एजन्सी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सांगणे अपेक्षित आहे. मोबाईल नंबर लिंक केल्याने पेन्शनर व्यक्तीला मोबाईल क्रमांक लिंक केल्यामुळे एसएमएसद्वारे डिजिटल प्रमाणपत्र अपलोड आल्याची माहिती मिळते, त्याचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर पुणे शहराचे प्रवार अधीक्षक मुकुंद बडवे यांनी केले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले