लॉकडाऊन असल्याने घोड्यांचीही होतीये उपासमार...

लॉकडाऊन असल्याने घोड्यांचीही होतीये उपासमार...
Updated on

पिंपरी : अंगावर भरजरी शाल, गळ्यात पट्टा, पायात घुंगरू, डोक्‍यावर टोप, विविधरंगी साज परिधान केलेला रुबाबदार घोडा पाहून हरखून न गेलं तर नवलंच. खास लग्नसराईत मोठी मागणी असलेल्या आमच्या घोड्यांचा रुबाब दाखवायचा तरी कुणाला? अशी हतबल अवस्था शहरातील घोडेमालक व्यावसायिकांची झाली आहे?

लग्न म्हटलं की मिरवणुकीशिवाय शोभा नाही. मिरवणूक म्हटलं की नवरदेवासाठी रुबाबदार घोडा आलाच. आजही नटलेले घोडे पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळी घोड्याच्या अवतीभवती जमा होतात. बॅंडच्या तालावर पावले ही थिरकतात. मात्र, लॉकडाउनमुळे ऐन लग्नसराईचा हंगाम हुकल्याने घोडे जागेवरच उभे असून घोडे मालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी घोडे व्यावसायिक आहेत. शहरात हातावरचे पोट असलेल्या या व्यावसायिकांना आजही घोड्यांच्या उदरनिर्वासाठी कसरत करावी लागत आहे. घोड्यांचे खाद्य कडबा आणि कुट्टी चौपटीने महागली आहे. चार रुपये किलो दराने असलेले हे खाद्य आत्ता वीस रुपये किलो झाले आहे. तळवडेतून हे खाद्य घोड्यांसाठी शहरात आणले जाते. मात्र, सध्य स्थितीत वाहनांअभावी खाद्य मालकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे घोड्यांवर उपाशी रहायची वेळ आली आहे. अक्षरक्ष: घोड्यांना चौकस आहार मिळत नसल्याने घोड्यांची पोटं खपाटीला गेली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

घोड्यांची उपासमार

डांगे चौक, चिंचवडगाव, काळेवाडी या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्नासाठी घोड्यांची ऑर्डर असते. तीन महिन्यांत ही मंडळी अख्ख्या वर्षभराची उलाढाल करतात. एका ऑर्डर पाठीमागे अडीच ते तीन हजार रुपये मिळतात.

घोड्याचा आहार मोठा व वैविध्यपूर्ण असल्याने काळजी घ्यावी लागते. पांढरेशुभ्र व घोडे चकचकीत दिसण्यासाठी रोज त्यांची स्वछता करावी लागते. हाताखालचे मजूरही काम नसल्याने गावी निघून गेले आहेत. सध्या संसर्गाच्या भीतीने या घोड्यांच्या वैद्यकीय तपासण्याही वेळोवेळी केल्या जात आहेत. 

माझ्याकडे तीन घोडे आहेत. घोड्यांना खाद्य आणायला गेलं तरी पोलीस अडवणूक करत आहेत. राजा, कृष्णा, काळामुंडी या माझ्या घोड्यांचा सांभाळ करणं अवघड झालंय. आमच्या पोटाची पंचाईत झाली आहे. मात्र या मुक्‍या जित्राबांची देखील उपासमार होत आहे. आमच्या जगण्याचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या मी ट्रान्सपोर्ट नगरला खाण्याचे पॅकेट मिळतात ते खाऊन कसेबसे दिवस काढत आहे.

- भरत पवार, घोडे व्यावसायिक, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com