खवय्यांची उद्यापासून चंगळ; हॉटेल, रेस्टॉरंट होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

  • शहरात रेस्टॉरंट, हॉटेल ग्राहकाच्या स्वागतास सज्ज 

पिंपरी : कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार सोमवारपासून (ता. 5) सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर परिसरातील स्टार हॉटेल्सपासून उपाहारगृहांमध्ये रविवारी (ता. 4) साफसफाई व सजावटची लगबग सुरू होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी ते तयार झाले असून, खवय्यांची चंगळ होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आवास योजनेच्या अर्जासाठी मिळालीय मुदतवाढ 

लॉकडाउन झाल्यापासून हॉटेल व बार बंद आहेत. त्यांची संख्या शहरासह हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण परिसरात सुमारे दोन हजार आहे. सोमवारपासून ते पन्नास टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. या बाबत पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, "सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हॉटेल सुरू ठेवणार आहोत. यासाठी सर्व सदस्यांची बैठक घेऊन विचारविनिमय केला आहे. प्रवेशद्वारावरच थर्मल गनद्वारे ग्राहकाची तपासणी केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दोन टेबल व खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले जाईल. रोखीऐवजी डीजिटल पद्धतीनेच शक्‍यतो पेमेंट घेतले जाईल. चांगल्या दर्जाचे विघटनशील पेपर, डिश, नॅपकिन वापरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, कामगारही पूर्ण क्षमतेपणे उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण भासणार आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels, restaurants will starts from tomorrow