
पिंपरी : घरामध्ये नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागली, की सर्वांनाच आनंदी आनंद होतो. गुडन्यूजच्या आनंदात सर्वच जण असतात. पण, सध्या या गूडन्यूजवरच कोरोनाचे सावट येऊ शकते. कारण, गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवडमधील 17 तर, आठ दिवसांत नऊ गरोदर महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी आठ जणी ठणठणीत बऱ्या झाल्या असून, सहा जणींनी गोंडस बाळांना जन्मही दिलेला आहे. तेव्हा, घाबरू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या आणि तणावमुक्त रहा.
गरोदर महिलांनासुद्धा करोनाचा संसर्ग होऊ लागला असल्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयातील आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत 17 तर, आठ दिवसांत नऊ जणींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांनीही काळजी घेण्याची गरज आहे. कारण, मे अखेरपर्यंत संसर्ग झालेल्या गरोदर महिलांची संख्या अवघी आठ होती. पैकी चार महिलांचे सिझरीयन करण्यात आले. तर, प्रसुती झाल्यानंतर दोन महिलांना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले होते. तसेच, तीन व पाच महिन्यांच्या गरोदर दोन महिलांनाही संसर्ग झालेला होता. त्यांच्यावर चौदा दिवस उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण 11 मार्च रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला. तेव्हापासून सोमवारी दुपारी तीनपर्यंत (ता. 8) अर्थात गेल्या तीन महिन्यात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 789 झाली होती. त्यात गरोदर महिलांची एकूण संख्या 17 आहे. मात्र, मे अखेरपर्यंत अवघी आठ असलेली ही संख्या गेल्या आठ दिवसात आणखी नऊने वाढली आहे. म्हणजेच आणखी नऊ जणींना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, लॉकडाउनच्या काळात 130 महिलांची प्रसुती झाली असून त्यांच्यासह बाळांचे रिपोर्टही निगेटीव्ह आलेले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कम्युनिटी संसर्गाचे लक्षण
गरोदर महिला शक्यतो घराबाहेर जात नाहीत. केवळ तपासणीसाठी दवाखाना किंवा रुग्णालयातच त्या जात असतात. तरीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्या कोणाच्या संपर्कात आल्या हे सांगणे कठीण आहे. त्यावरून हे कम्युनिटी संसर्गाची लक्षणे असल्याचे एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित गरोदर महिलांची एकूण संख्या 17 आहे. सध्या नऊ जणींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारानंतर बऱ्या झाल्याने आठ जणींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संसर्ग झालेला असताना सहा महिलांची प्रसुती करण्यास डॉक्टर यशस्वी ठरले आहेत. सध्या आणखी चार गरोदर महिलांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले असून त्यांचा रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गरोदर महिलांनी फ्लू व कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून दूर रहावे, नियमित साबनाने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा, पुरेसे शिजवलेले व जीवनसत्वयुक्त अन्नपदार्थ खावेत, गरोदर महिलेसह अन्य कुटुंबीयांनी घरातसुद्धा मास्कचा वापर करावा, गरोदर महिलांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, फोनच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या व्यक्तींच्या शक्यतो संपर्कात येऊ नये, घरातसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.