esakal | पिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. परिणामी यंदा शाळांच्या मैदानाऐवजी घरात बसूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे ना विद्यार्थ्याची गर्दी. ना त्यांची भाषणे ऐकायला मिळणार. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षी शाळा-कॉलेजमध्ये स्वातंत्र दिन व प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय सणांबरोबरच इतरही राष्ट्रीय सण मोठ्या धुमधडाक्‍यात साजरे केले जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील 665 शाळा-कॉलेज अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे एरवी दरवर्षी मुले स्वातंत्र्य दिन तसेच, प्रजासत्ताक दिनी मुले परिसरातून स्वच्छ गणवेशात प्रभात फेरी काढतात. हातात तिरंगा फडकावत मोठ्या दिमाखात राष्ट्रीय पुरुषांच्या व 'भारतमाता की जय' घोषणा देत गावाचा परिसर दुमदुमून काढतात. मात्र, यंदा या घोषणाही ऐकावयास मिळणार नाहीत. यंदा मुलांना स्वातंत्र्य दिनाची शाळेच्या व्यासपीठावर भाषणे करता येणार नाहीत. ना मुलांची प्रभात फेरीही दिसणार नाही. त्यामुळे मुलांशिवाय हा पहिलाच स्वातंत्र्यदिन आता शाळा व्यवस्थापनेला करावा लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाची चाहूल लागताच शाळा कॉलेजमधील मैदानाची साफसफाई आदी गोष्टी सुरू होतात. शालेय मुले व शिक्षकही त्या सणाच्या तयारीला लागतात. कपडे धुण्यापासून ते थेट त्या कपड्यांना इस्त्री करण्यापर्यंत मुलांची धावपळ सुरू असते. तसेच, अनेक पालक मुलांना नवीन कपडे, बूट किंवा चप्पल घेणे आदी गोष्टी याच पार्श्‍वभूमीवर खरेदी करतात. दुकानात जाऊन तिरंगा खरेदी करण्यात चिमुकल्यांची मोठी मौजमजा असते. मात्र, हा आनंद यंदा या विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षी असा होणार झेंडावंदन 

शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत सकाळी साडेआठ पूर्वीच ध्वजवंदनाचा कार्यक्रम उरकायचा आहे. याबाबत सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)चे पालन करत, त्या सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेत बोलविण्यात येऊ नये. शाळा प्रतिबंधित क्षेत्रात असू नये. या कार्यक्रमासाठी गर्दी होणार नाही. याबाबत आयोजकांनी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी दिली.