...असे शोधले जाताहेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

...असे शोधले जाताहेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

पिंपरी : सर्दी, खोकला, ताप, घशात खवखवतंय, कणकण वाटतेय, अशी रुग्णाची तक्रार असते. त्याची कोरोना संसर्ग तपासणी केली जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की, त्यातील तीव्र व सौम्य लक्षणांनुसार रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. उपचार सुरू होतात. त्याच्या कुटुंबीयांसह संपर्कात सर्व व्यक्तींची तपासणी केली जाते. तो राहात असलेल्या परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जाते. घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्य किती, त्यांना काही त्रास, बाहेर गावाहून कोणी आलंय, बाहेर गावी कोणी गेलंय, कोणाला गंभीर आजार अशी माहिती विचारली जाते. त्यानुसार संशयितांची तपासणी करून स्वॅब घेतले जातात. पॉझिटिव्ह आढळल्यास उपचार केले जात आहेत. निगेटिव्ह असलेल्यांना घरी सोडले जाते. शिवाय, महापालिकेने विकसित केलेल्या 'ऍप'द्वारेही अशी माहिती संकलित केली जात आहे. अशा पद्धतीने रुग्ण शोध मोहीम पिंपरी-चिंचवड शहरात राबविली जात आहे. 

शहरातील कोरोना रुग्ण शोध मोहीम, त्यावर उपाययोजना या बाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिक शोध मोहीम सुरू आहे. त्यासाठी सध्या रोज एक हजार स्वॅब तपासणी केली जाते. लवकरात लवकर रुग्ण शोधून त्यांना आयसोलेट (विलगीकरण) करण्यावर भर दिला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे, यासाठी जनजागृती आणि मास्क न वापरणारे व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याची कारवाई सुरू आहे. रुग्ण आढळलेला परिसर सील करून कंटेन्मेंट झोन जाहीर केला जात आहे. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.'' 

सध्या महापालिका व खाजगी रुग्णालयांची मिळून चार हजार बेड क्षमता असून, ती पुरेशी आहे. तरीही बेड संख्या आठ हजार करण्याची व कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगून आयुक्त हर्डीकर म्हणाले, "कोरोनाबाबतची माहिती देवाण-घेवाणीसाठी सारथी हेल्पलाईनमध्ये कोरोना कक्ष चालू करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेता नवीन डॉक्‍टर भरती केली आहे. दहा रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. रुग्ण शोध मोहीम, पाठपुरावा, समुपदेशन व वैद्यकीय मार्गदर्शन यासाठी 30 मल्टीपर्पज वर्करची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क वापरणे हे एक प्रकारचे लॉकडाउन सारखेच आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करणे, निरस्त करण्याबाबतचे आधिकार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित क्षेत्रातील रुग्णांची वाढ होत आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्राचा आवश्‍यकतेनुसार विस्तार करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com