घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी 'ही' बातमी वाचा

घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी 'ही' बातमी वाचा

तळेगाव स्टेशन (पुणे) : कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी घरगुती पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं बनवण्याचा साहित्य संच तळेगाव दाभाडे येथील पर्यावरणप्रेमी संशोधक प्रसाद सिंदगी यांनी विकसित केला असून, त्याला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने घरच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गणेशमूर्तींचा आकार आणि विसर्जनावर बंधने आणली आहेत. कोरोनामुळे कामगारांचा तुटवडा असल्याने गणेशमूर्तीं निर्मितीवरही मंदीचे सावट आहे. त्यामुळे घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं तयार करण्याचे कीट प्रसाद सिंदगी यांनी तयार केले आहे. प्रिमिटिव्ह इंडियन टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडेनिर्मित तसेच, कमिन्स इंडिया फाउंडेशन, थम क्रिएटिव्ह यांच्या सौजन्याने आणि पुणे महापालिका यांच्या पाठिंब्यातून ही संकल्पना सादर करण्यात आली आहे. आठ इंच आकाराच्या गणेशमूर्तींचा साचा, लाल माती, बिनविषारी रंग, ब्रश, तुळशी आणि इतर आयुर्वेदिक वनस्पतींचे बी घातलेला मोदक आणि सोबत मूर्ती तयार करण्याची मार्गदर्शिका यांचा समावेश असलेला, हा मृण्मयी शुद्धी गणेश संच आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशमूर्तीं तयार करण्यासाठी गावरान माती वापरल्यामुळे घरच्या घरी छोट्याशा पात्रातील पाण्यात ती विसर्जन करता येईल. ही मूर्ती विरघळून उरलेली माती कुडींत अथवा बागेत उपयोगात येईल. मोदक मातीत टाकला, की तुळशीचे एक रोपटे उगवेल. अशा या संपूर्ण सेंद्रिय आणि विघटनशील मुर्तीमुळे पर्यावणास कसलाही धोका नसेल. तसेच साचा पुन्हा मूर्ती बनवण्याकामी वापरता येणार असल्यामुळे घरातील बालगोपाळांच्या कलेला वाव देखील मिळणार आहे. पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेला हा गणेशमूर्ती संच वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी सिंदगी हे प्रयत्नील आहेत. विशेष म्हणजे हा संच अगदी घरपोच मिळणार असल्याने गणेशभक्तांना कुठेही गर्दीत जाण्याची गरज पडणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मृण्मयी गणेश संकल्पनेद्वारे कोरोना संसर्गाबाबत गर्दी आणि संपर्क टाळण्याबरोबरच कलेला वाव देणे अपेक्षित आहे. बाजारातील मूर्तीच्या किंमतीशी तुलना करता वाजवी दरात हे किट उपलब्ध होईल.
- प्रसाद सिंदगी, युवा संशोधक, तळेगाव दाभाडे

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com