

Maharashtra HSRP Deadline Extended
ESakal
पिंपरी - उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या मुदतवाढीनंतरही मोठ्या संख्येने वाहनचालकांनी नंबर प्लेट बदलून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता विभागाने आणखी मुदतवाढ देत ३१ डिसेंबरपर्यंत एचएसआरपी बसविण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. वाहनचालकांनी नियत मुदतीत एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.