esakal | घर खर्चासाठी पैसे मागितल्यानं पत्नीवर चाकू हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

घर खर्चासाठी पैसे मागितल्यानं पत्नीवर चाकू हल्ला

पत्नीने घरखर्चासाठी पैसे मागितल्याने पतीने तिच्यावर चाकूने वार केला.

घर खर्चासाठी पैसे मागितल्यानं पत्नीवर चाकू हल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पत्नीने घरखर्चासाठी पैसे मागितल्याने पतीने तिच्यावर चाकूने वार केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे घडली. याप्रकरणी आरोपी पतीवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गणेश नरेंद्र तोडकर (वय 44, रा. वायसीएम रुग्णालयाजवळ, संत तुकारामनगर, पिंपरी) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी वर्षा तोडकर यांनी फिर्याद दिली. शनिवारी (ता. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास पती-पत्नी दोघे घरी होते. त्यावेळी वर्षा यांनी गणेश याच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. याचा राग आल्याने चिडलेल्या गणेश याने जर्किनमध्ये लपवून आणलेल्या चाकूने वर्षा यांच्या हातावर वार केला. यामध्ये वर्षा यांना गंभीर दुखापत झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपचारासाठी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, आर्थिक कारणावरून कुटुंबातील व्यक्तीवरच हल्ला करण्याच्या घटना वाढत आहेत.