स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; वाकडमधील घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

वाकड येथे एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने उघडकीस आणले. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली.

पिंपरी - वाकड येथे एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने उघडकीस आणले. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी विशाल पवनकुमार अग्रवाल (रा. पाचपीर चौक, काळेवाडी), आबासाहेब भाऊसाहेब तागड (रा. पिंपळे गुरव) यासह स्पाची मालक व व्यवस्थापक असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड येथील दत्त मंदिर रोड येथे फॉरेव्हर स्पा झोन स्कीन केअर या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून खात्री केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी (ता.१) सायंकाळी साडेचारला छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली. तिघे आरोपी स्पा सेंटर भागीदारीत चालवत होते. या कारवाईमध्ये सहा मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incident sex racket Wakad under the name of spa center