school portal
sakal
पिंपरी - शाळा व्यवस्थापनाने वर्ग, तुकडी, विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार अशी माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे ‘स्कूल पोर्टल’वर अपलोड करणे सक्तीचे आहे. त्याबाबत त्यांना शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. तरीही पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील २१० शाळांनी त्याकडे काणाडोळा केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.