esakal | खासगी बॅंकांचे ढिसाळ नियोजन; पिंपरीतील खातेदारांचे हाल
sakal

बोलून बातमी शोधा

Bank

सध्या कोविडमुळे अनेक राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बॅंकांमध्ये अनेक नियम लागू केले आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतांश बॅंकेच्या कामकाजाची वेळ ही सकाळी दहा वाजताच सुरू होतेय.

खासगी बॅंकांचे ढिसाळ नियोजन; पिंपरीतील खातेदारांचे हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मी सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील आयसीआयसीआय बॅंक ग्राहकांच्या रांगेत उभा होतो. पावणेदोन वाजता माझे काम झाले. भर उन्हात खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे, पण बॅंक व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे खातेदारांचे हाल होत असून वेळेचा अपव्यय होत असल्याचा अनुभव तानाजी सातव या खातेदारांनी 'सकाळ'कडे कथन केला. 

प्रकृती बिघडल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात दाखल

सध्या कोविडमुळे अनेक राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बॅंकांमध्ये अनेक नियम लागू केले आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतांश बॅंकेच्या कामकाजाची वेळ ही सकाळी दहा वाजताच सुरू होतेय. तिथेही आपला रांगेत पहिला क्रमांक यावा, यासाठी अनेकजण सकाळीच आठ वाजता येऊन रांगेत थांबतात. अशीच वेळ चिंचवड येथील आयसीआयसीआय बॅंकेची आहे. या बॅंक परिसरात नागरिक आपल्या विविध खात्यातील पैसे काढणे किंवा पैसे जमा करण्याकरिता, तसेच बॅंकेचे विविध काम करण्याकरिता नागरिक येत असल्याने या बॅंकेच्या बाहेरही सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते. बाहेर रांगेत तासन्‌तास ग्राहक ताटकळत थांबलेले असतात.

- हेही वाचा- नोटबंदीनंतरची प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

एकीकडे ऑक्‍टोबर हिटचा त्रास आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनात विशिष्ट अंतरावर उभे राहणे आवश्‍यक आहे, पण ऊन जास्त प्रमाणात तापत असल्याने ग्राहक रांगेत एकमेंकाना चिटकूनच थांबलेले असतात. अत्यंत मंदगतीने बॅंकिंग कामकाज होत असल्याने शुल्लक कामांसाठीदेखील वेळेचा अपव्यय होत असल्याची तक्रार सातव यांनी 'सकाळ'कडे केली होती. परिणामी बॅंकेने ग्राहकांना उभे राहण्यासाठी मंडप टाकून सावलीची आणि थंड पाणी पिण्याची व्यवस्था करावी. वयोवृद्ध तसेच अपंग खातेदारांना बसण्याची व्यवस्था करून त्याची कामे प्रथम करून द्यावी, अशी मागणी खातेदारांकडून होत आहे. 

याबाबत बॅंकेचे व्यवस्थापक सचिन तोडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र दररोज पाच खातेदारांचे काम पाहण्याच्या सूचना दिल्याचे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)