

Indrayani River Pollution Ahead of Kartiki Wari
eSakal
आळंदी : कार्तिकी वारी अवघ्या १५ दिवसांवर आलेली असताना, आळंदीतील इंद्रायणी नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा तीव्र विळखा पडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून येणारे प्रक्रियारहित सांडपाणी आणि वाहून आलेली जलपर्णीमुळे नदीपात्र आणखी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा आणि श्रद्धेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.