

Pavitra Recruitment Row: Schools Struggle as Selected Teachers Stay Absent
sakal
पिंपरी: ‘पवित्र’ पोर्टलद्वारे निवड होऊनही अनेक शाळांवर शिक्षक रुजू होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील शिक्षकांचा अनुशेष कायम आहे. त्यांना रुजू होण्याबाबत प्रशासन वारंवार आदेश देत आहे. पण, त्याकडे या उमेदवारांनी काणाडोळा केला आहे. यात सुमारे ८० टक्के शिक्षकांनी विविध कारणे देत शाळा नाकारली आहे.