
Pimpri Chinchwad
Sakal
चिंचवड : आकुर्डीतील महापालिकेच्या कै.प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयात पैशांअभावी बेवारस रुग्णाची वैद्यकीय तपासणी रोखण्यात आली. तसेच रुग्णालयामधून डिस्चार्ज देताना अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) शुल्काचीही मागणी करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. अखेर एका सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचे बिल माफ केले.