एकतर्फी प्रेमातून त्याने विवाहितेचा खून केला अन् आज त्याचा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा चाकूने वार करून खून करीत तरुणाने स्वत:वरही वार करून घेतले. या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पिंपरी : एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा चाकूने वार करून खून करीत तरुणाने स्वत:वरही वार करून घेतले. या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अरविंद शेषराव गाडे (वय 34, रा. अशोका हाउसिंग सोसायटी, अजंठानगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गाडे याने शनिवारी राणी सतीश लांडगे (वय 29, रा. गजरमल चाळ, अजंठानगर, चिंचवड) या विवाहितेचा खून केल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. या बाबत राणी यांच्या पतीने त्याला समजावून सांगितले होते. तसेच, तो वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांकही बदलला होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शनिवारी (ता. 2) दुपारी राणी या चिखली, शिवतेजनगरमधील फेज क्रमांक 18, प्लॉट क्रमांक 568 येथील रस्त्याने कामावरून घरी पायी जात असताना अरविंदने त्यांना रस्त्यातच अडविले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करून घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पिंपरीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचाही मृत्यू झाला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: injured young man dies during treatment