शिकारी ते फूल निर्यातदार; मावळातील आदिवासी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

रामदास वाडेकर 
Saturday, 3 October 2020

  • किवळेतील युवकाची यशोगाथा
  • आदिवासी हिंदू महादेव कोळी समाजातील पहिलाच 

कामशेत (मावळ) : आदिवासी हिंदू महादेव कोळी समाजातील सध्याची पिढी खेकडे, कंदमुळे, रानभाजा गोळा करीत आहेत. काही मासेमारी, शिकारीत रमली आहेत. मात्र, शिकारीत चालणारे हात फुलशेतीत राबू लागले. बघता बघता आदिवासी समाजाच्या एकोणीस गावांतील पहिला तरुण निर्यातदार फूलविक्रेता झाला. किवळेतील रामदास गोडे असे त्याचे नाव. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरक्षणामुळे आदिवासी हिंदू महादेव कोळी समाजातील शिकलेली पिढी सरकारी सेवेत दाखल झाली. कोणी तालुक्‍याचे सभापती, कोणी जिल्हा परिषद सदस्य, कोणी सरपंच, कोणी पोलिसपाटील झाले. दुसरी पिढी मासेमारी, शिकारीकडे वळली. मात्र, या समाजातील शासकीय आश्रमशाळेत सातवी नापास झालेल्या मुलाने परंपरेला छेद दिला. पंधराव्या वर्षी पॉलिहाऊसमध्ये मजुरीचा सुरुवात केली. तेथील अनुभवाच्या जोरावर त्याने स्वतःचे पॉलिहाऊस सुरू केले. इकतेच नाही, तर तो परदेशात गुलाबाची निर्यात करतो. त्याला बॅंकेने 27 लाख रुपये कर्ज दिले. सरकारने 16 लाख रुपये अनुदान दिले. रामदासचा वर्गमित्र राजू चिमटे सांगत होता, "बॅंकेच्या सुरक्षारक्षकांने त्याला दारातून हाकलून दिले होते. बॅंकेच्या मॅनेजरने कर्जासाठी वर्षभर चकरा मारायला लावल्या. सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्याने अनुदान मिळवले.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तानाजी पिचड म्हणाले,"रामदासने नापास झाल्यावर दिवसभर घरी आला नाही. लपून बसला. आईने त्याची समजूत काढून घरी आणले आणि तो दुसऱ्या दिवसापासून तो म्हशी चारायला घेऊन गेला. तेथे न रमता तो कशाळला पॉलिहाऊसमध्ये कामाला लागला. संभाजी बद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्षे तेथे नोकरी केली. आई मथाबाई म्हणाली, "पंधरा दिवस बापलेक एकामेकासमोर आले नाहीत. पुण्याच्या मुख्य कार्यालयातून सुरक्षारक्षकाने हाकलून दिले. पण हा खचला नाही. त्याने प्रयत्न नेटाने ठेवले. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना विश्वास दिला. वजनदार जामीनदार दिले. अनुदानासाठी अर्ज केला. त्याही कार्यालयाने अनुदान मंजुरीचे पत्र दिले. बॅंकेचे कर्ज मिळाले. स्वतःच्या व्यवसायाची भरभराट सुरू झाली. पहिल्या व्हॅलेंटाइन डेला दोन लाखांचा धनादेश मिळाला आणि वडिलांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वतःचे पॉलिहाऊस करण्याच्या विचाराने झपाटून गेलो होतो. कर्जासाठी बॅंक दारात उभी करेना. वडील बॅंकेचे इतके मोठे कर्जाचे ओझे डोक्‍यावर नको म्हणून तयार होईना. नातेवाइकांचा मध्यस्थीने वडिलांनी बॅंकेच्या कर्ज अर्जावर कशीबशी सही केली. 
- रामदास गोडे, फूलउत्पादक, किवळे 

फुलशेतीबाबत... 

  • क्षेत्र : 30 गुंठे 
  • वार्षिक खर्च : 12 लाख 
  • निव्वळ नफा : 6 लाख 
  • निर्यात : हॉलंड, जपान 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inspiring journey of flower exporter in kiwale maval